आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद! गोदावरी नदीवरील  कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी  

Water is on fire! Ghatge Patal's Elgar for thirsty villages, officials' talk is off! Canal gates on Godavari river opened and water released for farmers

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद!
गोदावरी नदीवरील  कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी  

अंबड : जायकवाडीच्या पाण्यावरून पेटलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी शुक्रवारी उसळला! समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजप नेते सतीश घाटगे पाटील यांनी तहानलेल्या गावांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट गोदावरी नदीच्या कॅनॉलचे दरवाजे उघडले. शेकडो शेतकऱ्यांच्या साथीनं घाटगे पाटलांनी गुळज आणि तळनेवाडी येथील कॅनॉलचे अडथळे झुगारून लावले आणि हक्काचं पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलं.

अंबड-घनसावंगी तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना, पिण्याच्या पाण्यासाठी आणि मुक्या जनावरांसाठी त्राहिमाम असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळेझाक करत होते. जायकवाडी धरणात पुरेसा साठा असूनही गोदाकाठच्या गावांना कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात चालढकल केली जात होती. या प्रशासकीय उदासिनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.

अखेरीस, सतीश घाटगे पाटील यांनी या असंतोषाचं नेतृत्व करत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला. शुक्रवारी, त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करत गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यावरील गुळज आणि तळनेवाडी कॅनॉलकडे कूच केली. संतप्त शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. घाटगे पाटील आणि शेतकऱ्यांनी स्वतः कॅनॉलचे दरवाजे उघडले आणि अडवलेलं पाणी अखेर गोदावरीच्या दिशेने मार्गस्थ झालं. या निर्णायक क्षणी शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि घाटगे पाटलांच्या हिमतीला सलाम केला. या आंदोलनात भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे, आसेफ कुरेशी, दत्ता लोने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

घनसावंगी -अंबड  तालुक्यातील दुष्काळी गावांची  परिस्थिती लक्षात घेऊन पाट बंधारे विभागाने लवकरच हे पाणी सोडायला पाहिजे होत. परंतु  पाट बंधारे विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.  आम्ही सरकारला बदनाम होऊ देणार नाही.  त्यामुळे शेतकरी हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात मंगरूळ , शिवनगाव,  जोग्लादेवी   बंधाऱ्यात एस्केप गेट उघडून पिण्यासाठी  पाणी न सोडल्यास  तिथले एस्केप गेट उघडून आम्ही पाणी खुले करणार आहोत.

-सतीश घाटगे पाटील,
 -भाजपा नेते तथा चेअरमन समृद्धी शुगर्स    

अधिकाऱ्यांची झाली बोलती बंद! कॅनॉलचे दरवाजे उघडले जात असताना, धावतपळत आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतीश घाटगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांची व्यथा आणि प्रशासनाची निगरगठ्ठ भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली, ज्यामुळे अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. संतप्त शेतकऱ्यांनीही अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला. “धरणात पाणी असूनही जर आमच्या शेतकऱ्यांच्या  जनावरांना प्यायला पाणी मिळत नसेल, तर या कॅनॉलच्या पाण्याचा काय उपयोग? अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी आणि गावकरी पाण्यासाठी तडफडत आहेत. म्हणूनच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले,” असे खडे बोल घाटगे पाटील यांनी सुनावले.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??