Top Newsमहत्वाचेमहाराष्ट्र

वेव्हज २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ विविध साधने पुरविणारे ‘एआय’ सर्जनशीलतेची जागा घेणार नाही

Waves 2025: A fusion of artificial intelligence and creativity AI, which provides various tools, will not replace creativity

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

वेव्हज २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ विविध साधने पुरविणारे ‘एआय’ सर्जनशीलतेची जागा घेणार नाही

मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे यामध्ये भारत आघाडीवर आहे.  इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेपर्यंतच्या डिजिटल प्रवासात भारताची भूमिका महत्वाची असल्याचे अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी  शंतनू नारायण यांनी सांगितले.

बीकेसी येथे सुरू असलेल्या वेव्हज २०२५ मध्ये शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला.

वेव्हज २०२५ : ‘एआय’च्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया

सत्रांमधील चर्चेदरम्यान,  एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे. ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अ‍ॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा म्हणजे वेव्हज २०२५ आहे.

“कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता” या विषयावर अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडताना बोलत होते. ‘एआय’ संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत श्री. नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली.

एनव्हीडीओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल म्हणाले की, “पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही.” एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन  पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे हा आहे. आता कृत्रिम प्रज्ञा  समर्थित जगात याचा  प्रतिध्वनी कसा उमटतो,

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??