Breaking

“सोनू”आमचा तुयावर भरवसा न्हाय न्हाय….! “सोनू” ने लोकांना लावला लाखोंचा चूना चुना…!!

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे दरमहा ४ ते ५ हजार रूपये घेवून भिसी च्या नावाखाली अवैध लकी ड्रॉ चालविणाऱ्या “सोनू,” ने शेकडो लोकांना लाखो रूपयांचा चूना लावून शहरातून पोबारा केला आहे या भिसीच्या व्यवहारात त्याने ४ते५कोटी रूपयांचा आर्थीक गफला केल्याचे समजते तो चालवित असलेल्या अवैध लकी ड्रॉ व लीलावाच्या भिसीत अनेक व्यापारी व लहान मोठ्या व्यवसाईकांचे २५ हजारापासून ते २५ लाखा पर्यंत रक्कम असल्याचे सांगण्यात आले गेल्या १ वर्षात असा प्रकार दूसऱ्यांदा घडला आहे महिलांना पैसे बचतीचे महत्व कळावे त्यासाठी काहि वर्षा पूर्वी सूरू झालेल्या भिसी या प्रकाराला सद्या शहरात मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूप मिळाले असून काहिंनी त्याला रोजीरोटीचे साधन करून छूप्या स्वरूपात सावकारीच सूरू केली आहे या व्यवसायात शहरातील काहिंनी यापूर्वी लाखोची माया गोळा करून पोबारा केला आहे तर नूकतेच एकाने २५० सभासद गोळा करून  त्याचे दोन चार ड्रॉ काढून हातवर केल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे या बाबत आर्थीक फसवणूक झालेल्या एका व्यापाऱ्याने सांगीतले कि शहरातील लालबाग शॉपींग सेंटर मधील माधव ट्रेडर्स च्या नावाने नाममात्र व्यवसाय करणारा मात्र दररोज वेगवेगळी भिसी चालविणारा सोनू बठेजा याने दरमहा ४ हजार रूपये २५ महिने भरायचे दरमहा मेंबरचे नाव काढायचे त्याला लाख रूपये द्यायचे पूढे त्याने काहीही पैसे द्यायचे नाही असे २५० मेंबरची लकी ड्रॉ भिसी चालवायची या प्रलोभनाला बळी पडलेल्या २५० जणांपैकी २५ जणांना लाभ झाला मात्र २२५ जणांना शेवटी रक्कमच मिळाली नाही दरमहा १० लाख रूपये सोनू कडे जमायचे या रक्कमेतून मौजमस्ती व ईतर प्रकार सूरू होते परवा त्याने अत्यंत नियोजनबध्द आपल्या कूटूंबासह रात्रीतून सामान भरून पोबारा केला दोन महिन्यापूर्वीच त्याने ते दूकानही ४१ लाखात विकून व्यवहार केला होता. अनेक जण आता त्याचे मागावर आहेत या प्रकाराला वेळीच आळा घालाण्याची गरज होती मात्र अमीषाला बळी गेले आज शहरात अनेकांनी भिसी चा व्यवसाय मांडला आहे यात अनेक मोठे व्यापारींसह लहान लघूऊद्योग करणाऱ्यांचाही समावेश आहे महिन्याकाठी लहान मोठ्या भिसीच्या माध्यमातून सूमारे १ कोटीचे आसपास व्यवहार होत आहे मूळात भिसी हा प्रकार पूर्वी गल्लीत महिला एकत्र येवून गूपचूपचे पैसे यात गूंतवून एकठोक रक्कम कॉईन किंवा चिठ्ठीच्या माध्यमातून महिन्यातून एक किंवा दोन वेळा हा ड्रॉ काढून ज्याचे नाव निघेल त्याला रक्कम दिली जात होती यात कोणाचे काही फायदा किंवा नूकसान नव्हता मात्र गेल्या काहि वर्षा पासून  भिसी या प्रकाराला व्यापाराचे स्वरूप मिळाले आहे अर्थात लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांना भिसी फायदेशिर ठरते बँकांकडून लवकर कर्ज मिळत नाही को अॉफ पतसंस्था बूडाल्यामूळे नँशनलाईज बँंकाकडून फिरवाफिरव केली जाते मल्टीस्टेट पतसंस्थांचे कर्ज परवडत नाही म्हणून भिसी याप्रकारात स्वतःचेच पैसे आठवडा १५ दिवस १ महिना असा येणारा   हप्ता त्यांना परवडतो भिसीचा हा पैसा १ ते २ टक्याने पडतो मात्र तो सहज उपलब्ध होतो यात कॉईनची किंवा लिलावाची भिसी चालविणारा मात्र फायद्यात राहात असल्याने याचे स्वरूप वाढले आहे याचा काहिंनी चांगलाच फायदा घेतला असून काही महाभागांनी अनधिकृत लकी ड्रॉ सारखा व्यवसाय सूरू केला त्यात चार चाकी वाहन मोटर सायकल सोने चांदीचे नाणे वैगेरेचे आमिष देवून एकदा पैसे भरलेवर त्याचा नंबर लागला कि पहिल्या चारपाच सभासदांना प्रोत्साहित करण्यासाठी  बक्षीस द्यायचे त्याला बक्षीस लागले नंतर पैसे भरायची गरज नाही शेवटच्या सभासदांना वस्तूंचे वाटप करण्याचे आमिष देवून लकी ड्रॉ सारखा अनधिकृत व्यवसाय करून त्याला “भिसी” हे गोंडस नाव देवून काहींनी यात स्वतःचा फायदा करून घेतला तर काही नूकसानीमूळे त्यांना तोंड लपवून गाव सोडण्याची वेळ आल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत यात मोजक्याच लोकांचा फायदा होवून अनेकांना मात्र नूकसान सहन करावे लागत आहे.

हा प्रकार कुठल्याही गून्ह्यात मोडत नाही व्यापार वाढीसाठी चलन वळनाला लागणारी एकठोक रक्कम मिळत असल्याने आर्थिक चणचण भासत नाही अनेक व्यापाऱ्यांकडे सूरू असलेली हि भिसी बाबत कोणाच्या तक्रारी किंवा बोंब नाही मात्र काहिंनी हा प्रकार लकी ड्रॉ सारखा सूरू केल्याने अनेकांची त्यात फसवणूक होत आहे याला वेळीच आळा बसण्याची गरज असून फसवणूक झालेल्यां पैकी कोणी पूढे येवून कायदेशीर लढा दिल्यास वचक बसू शकतो.

भूलथापांना बळी पडू नका…… 

गेल्या १०वर्षात अनेकांनी सर्वसामान्य जनतेचा गैरफायदा घेवून फसवणूक केली आहे यात ऊदाहरणा दाखल सांगायचे म्हटले तर मैत्रेय..धनादेश बोनस मालकाला अटक , पियरलेस… पत्ताच नाही

, कल्पवृक्ष… अचानक बंद पडलं ! ४०० कोटी बुडले, व्हिनस लाईफ मालक तुरुंगात  लोक रस्त्यावर , सगळे बुडाले.

दररोज रोकडा नुसत्या थापा..!

संचयनी… लोकांचे पैसे बुडाले,..!

केबीसी मालक पैसे घेऊन सिंगापूर ला फरार ?

रायसोनी मल्टीस्टेट सारख्या अनेक पतसंस्था बंद पडल्या संचालक तुरुंगात सोसायटी बंद खातेदार बुडाले! तशा अनेक मल्टीस्टेट सोसायटी बुडण्याच्या मार्गावर..

ईमू पक्षाचे अंडे योजना पैसे घेऊन मालक फरार !

जपान लाईफ गादी... पैसे गेले अन गादी वर झोपच नाही लागली.!

पर्लस्... भांगू पळाला.. एजंट लपून बसले . गुंतवणूकदार हवालदिल आर सी एम काही दुकानं बद पडली नोनी बळजबरी लोकांना आजारी म्हणायचे !

पँन कार्ड  धनादेश बोनस मालक स्वर्गवासी गेले. एकुण एक गुंतवणूकदार बुडाले.

समृद्ध जीवन  फसवणूकीमुळे मालकाला अटक ! हजारो करोड बुडाले.

सिट्रस- व्टिंकल… गोयेंका गायब, कंपन्या ची नावे बदलून लुटालुट सुरुच आता बंद पडले, पैेसे गेले सर्व गेले.

मूर्ख बनवणारे हजारो आपणच,

मूर्ख बनणारे लाखो आपणच,

कमी श्रमात अधिक पैसे कमविण्याचा शॉर्ट-कट मार्ग हवाय ना सगळ्यांना, म्हणुन वेगवेगळ्या नावाने दरवर्षी येणाऱ्या मार्केटींग कंपन्या मल्टीस्टेट सोसायट्या  यांची खुप मोठी यादी आहे.

ही सर्व धोखाधडी चालू असते, चालूच राहणार नवीन-नवीन नावाने.. नवीन बनेल चेह-याने…!

पुर्वीच्या प्लांटेशन कंपन्या प्रमाणे आता कॉईन च्या नावे हजारो कंपन्या आल्या आहेत.

रोज कोणीतरी कॉईन काढतो बघता बघता  ४८ तासात त्या कॉईन चा दर डबल होतो..

अवघ्या २ दिवसात झाले तुमचे पैसै डबल..

बिचाऱ्या बँका ८ वर्षे घेतात दुप्पट द्यायला पोस्ट ७ वर्षे घेते.. इथे मात्र केवळ ४८ तास मधे तुमचे पैसै दुप्पट …

परंतु प्रत्यक्षात काहीच नाही आभास फक्त.

व्हर्चुअल करंन्सी, डिजिटल पेमेंट, मायनींग, मोठे उच्चार, मोठी नावे.

मात्र शुध्द फसवणूक .. 

माणसाची स्वत:ची लालची वृत्ती व हव्यास त्याला स्वत:लाच फसवते.

आपल्या लोकांचे अज्ञान व आर्थिक अंधश्रध्दा याला कारणीभूत असली तरीसुद्धा आपल्याच देशबांधवांना फसवणारे महाठक याला जबाबदार आहेत !

बऱ्याच वेळा फसवणारे लोक आपल्यातलेच, मित्र-मैत्रिणी, गावातलेच,नात्यातलेच किंवा सलगी करून परिचय करून घेणारे असतात. आपल्याकडील पैसा लुबाडून नेला जाईपर्यंत, ते आपल्याला परके वाटतच नाहीत, शंका येत नाही आणि तिथेच आपली फसगत झालेली असते.

आपल्या पैश्यांची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

आपल्या कुटुंबासाठी कमविलेले मेहनतीचे पैसे कुणा फसव्या माणसाकडे जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

आर्थिक बाबींचे आकलन करावे, स्किमचा अभ्यास करावा, त्याच व्यवसायातील इतर चार जाणकारांना विचारावे, विचार करण्यास वेळ घ्यावा आणि मग निर्णय घ्यावा. नकार द्यायला घाबरू नये.

कुठल्याही कंपनीच्या, त्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हच्या सुटाबुटातल्या मँनेजरच्या भूल- थापांना, लबाड भाषेला,बडेजाव- झगमगाटाला फाईव्ह स्टार मधल्या मिटिंग, अत्यंत खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. 

“शक्य तो अशा लोकांच्या आधार कार्ड ची झेरॉक्स, व्होटर कार्ड,ड्रायव्हींग लायसन्स ची झेरॉक्स मागा आणि कंपनीच्या नावा सहीत नजिकच्या पोलिस स्टेशन मधे देऊन ठेवा.”

म्हणजे भविष्यकाळात पोलीसांचे काम सोपे होईल.  असे आवाहन करून त्याचा व्यापक प्रसार करण्याची गरज आहे

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??