शिक्षण मंदीराचे पावित्र्य राखण्यासाठी खबरीलाल असेल ‘दक्ष’ मदिरा पिणारे काही “गुरूजी”वर खबरीलाल ठेवेल “लक्ष”… अनेकांचे उध्वस्त होणारे संसार उभारण्यासाठी खबरीलालची अनोखी लढाई.
कर्तव्यावर असूनही मदिरेचा आस्वाद घेणारे तसेच दिवस रात्र दारूच्या गुत्यावर बसणारे सट्टा-जुगार क्लब मध्ये बसणाऱ्यांवर आता खबरीलालची ‘नजर’ राहणार असून त्यांचे चित्रीकरण जनतेच्या न्यायालयात आणणाऱ्या खबरीलालचा निर्धार आहे.
अधिकारी लक्ष देत नसल्याने समाजाच्या हितासाठी व शिक्षण क्षेत्राचे पवित्र टीकवण्यासाठी खबरीलाल ने पुढाकार घेतला आहे.
यातच उत्तम प्रकारे शिकविणारे व न पिणारे चांगल्या “गुरूंचा” खबरीलाल कडून नतमस्तक “प्रणाम” व धन्यवाद.
परवा या संदर्भात “तालुक्यातील गलेलठ्ठ पगार घेणारे अनेक “गुरूजी”-‘दारू’च्या गुत्त्यावर “विसावा” घेतात…”
वृत्त प्रसिद्ध करताच शेकडो जागरूक नागरीकांनी खबरीलाल चे कौतुक करत धन्यवाद दिले. त्याच वेळी शिक्षकांमध्ये घबराट उडाल्याचेही दिसून आले.यातच खबरीलाल चा कॅमेरा आपल्यावर पडू नये म्हणून चालती वर गाडी सुरू झाली.तासन तास बसणारे काउंटर पॅक मारू लागले आहेत. घेतल्याशिवाय चालत नाही परंतु बदनामीचा धसका घेतल्याने ही मंडळी आता मागच्या दरवाजाने कोपरे शोधत आपली गाडी फुल करतांना दिसत आहे त्यांनी घेतलेल्या धसका हे खबरीलाल चे “यश”आहेच.
खबरीलालचा परिणाम जाणवून येत असल्या तरी पार्सल घेऊन इकडे-तिकडे जाणाऱ्यांवरही खबरीलालची टीम नजर ठेवणारं. घटने मागिल सत्य.. बातमीतील तथ्य.. ठामपणे मांडणारे एकमेव खबरीलाल आहे. पाठीमागे कुरकुर करणाऱ्या (गुरू) प्राध्यापक,शिक्षकांना सांगू इच्छितो की शिक्षक,प्राध्यापकांच्या कळपात खबरीलालचे ‘हस्तक’ आहेत. खबरीलालचं वाक्य आहे “हर खबर पर नजर” हे त्यांनी लक्षात घेतलेले बरें. शिक्षकांना त्रास देणे हा उद्देश खबरीलाल चा मुळीच नाही. परंतु शिक्षणक्षेत्र व्यसनमुक्त करण्यासाठी घेतलेला वसा आहे. यात जागरूक नागरीकांची देखील साथ हवी आहे. जेणे करून ही लढाई यशस्वी होऊ शकेल,अनेकांचे आरोग्य सुधारेल, त्यांचे उध्वस्त होणारे संसार वाचतील.आणि विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण व संस्कार मिळतील हा शुद्ध हेतू खबरीलालचा आहे. म्हणून अन्य जागरूक नागरीकांनी या संदर्भातील वृत्त,फोटो, व्हीडिओ, गोपनीय काढून ह्या खबरीलालच्या अधिकृत मोबाईल “९४२३६५८१८१” क्रमांकावर पाठवावे, अशा जागरूक लोकांचे नाव गुपित ठेवले जाईल ह्या वचनासह धन्यवाद