आपला जिल्हाक्राईम न्युजजालना जिल्हाताज्या घडामोडी

जालना पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह एक ताब्यात

By तेजराव दांडगे

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

जालना पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसांसह एक ताब्यात

जालना, दि. ०५ सप्टेंबर २०२५: जालना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांनंतर, स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (०५ सप्टेंबर २०२५) एका व्यक्तीला गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती गोळा करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, प्रवीण संतोष तायडे (वय २३, रा. गोकुळवाडी, जालना) नावाचा व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगत आहे.

या माहितीच्या आधारे, पोलिसांनी जालना शहरात प्रवीण तायडे याचा शोध घेतला असता, तो खरपुडी चौफुली येथील इंडियन ढाब्यासमोर आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र) आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या पिस्तुलाचा पुरवठा कोणी केला, याबाबत विचारणा केली असता प्रवीण तायडे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ आणि स्थागुशाचे अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, प्रभाकर वाघ, भाऊराव गायके, रमेश राठोड, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास, इरशाद पटेल, रमेश काळे, कैलास चेके, अशोक जाधवर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Tejrao Dandge

तेजराव दांडगे यांनी महा डिजिटल मीडिया असोसिएशनचा बी ग्रेड मिळवत ऑनलाइन डिजिटल पत्रकारिता अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, याबद्दल MDMA च्या वतीने त्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मागील आठ वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. तेजराव दांडगे यांनी बी.ए. पदवी शिक्षण पूर्ण केले असून, जालना येथे जिल्हाधिकारी मा. श्री. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात एमसीईडी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी कॉम्पुटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यासोबतच, ते महावितरण कंपनीमध्ये प्रभुलीला एजन्सीच्या माध्यमातून मीटर वाचनाचे अर्धवेळ काम करतात. त्यांचे स्वतःचे आरोही झेरॉक्स सेंटर असून त्याद्वारे ते ऑनलाइन स्वरूपाची कामे देखील करतात. डिजिटल मीडिया क्षेत्रात तेजराव दांडगे सक्रियपणे कार्यरत असून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??