Top Newsमहत्वाचेमहाराष्ट्र

नागपूरच्या राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटला मिळणार ‘प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट’चा दर्जा, ‘स्वस्ति निवास’मुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा दिलासा

Nagpur's National Cancer Institute will get 'Premier Research Institute' status, 'Swasthi Niwas' will be a great relief to patients and relatives

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

नागपूरच्या राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटला मिळणार ‘प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट’चा दर्जा, ‘स्वस्ति निवास’मुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा दिलासा

नागपूर, दि. 26: केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) येथील ‘स्वस्ति निवास’चे भूमिपूजन थाटात संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NCI ला भविष्यात ‘प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट’ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली, ज्यामुळे कॅन्सरवरील संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘स्वस्ति निवास’च्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की, कॅन्सर पीडितांच्या कुटुंबीयांना राहण्याची योग्य सोय मिळावी या हेतूने ‘स्वस्ति निवास’ उभारण्यात येत आहे. अनेकदा कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागतो आणि निवासाची अपुरी सोय असल्याने त्यांच्या अपॉईंटमेंट्स चुकू शकतात किंवा उपचारास विलंब होऊ शकतो. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या माध्यमातून ‘स्वस्ति निवास’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे.

‘स्वस्ति निवास’मध्ये रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा NCI चा प्रयत्न आहे. या प्रकल्पाला पेर्नोड रिकार्ड इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनीने त्यांच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत आर्थिक सहाय्य पुरवले आहे.

‘स्वस्ति निवास’ची वैशिष्ट्ये:
विस्तृत बांधकाम क्षेत्र: ‘स्वस्ति निवास’च्या प्रस्तावित डिझाईनमध्ये सुविधा केंद्र संकुल, फूड कोर्ट आणि एकूण १.७ लाख चौ. फूट बांधकाम क्षेत्राचा समावेश आहे.
४०० रुग्णांना निवासाची सोय: या माध्यमातून एकाच वेळी ४०० रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
आर्थिक भार कमी होणार: यामुळे रुग्णांचा उपचारासाठी दीर्घकाळ राहण्याचा आर्थिक भार कमी होऊन कॅन्सर उपचार अधिक परवडणारे होण्यास मदत होईल.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिन टुबुल आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘स्वस्ति निवास’च्या भूमिपूजनामुळे कॅन्सर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार असून, NCI च्या माध्यमातून कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??