महत्वाचेमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मुंबई, दि. १९ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य कार्यक्रम सौमय्या महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी मुख्य कार्यक्रमासोबतच बोरिवली येथील शैलेंद्र स्कूल आणि विलेपार्ले येथील एन. एम. कॉलेज येथेही योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्र आणि दीक्षा कदम संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, नामांकित खेळाडू तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. योगाबाबत जनजागृती व्हावी आणि त्याचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योग दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

D9 News मराठी

सूचना - ((D9 News हे आधुनिक युगातील एक अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. 'D' म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आणि '9' म्हणजे नवदृष्टी! सामाजिक बांधिलकी, सत्यता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जनसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे हेच आमचे ध्येय आहे.)) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??