आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी

दिवाळी सणात फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार कुठे कराल? जालना पोलिसांकडून नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर!

By तेजराव दांडगे

दिवाळी सणात फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार कुठे कराल? जालना पोलिसांकडून नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर!

जालना: आगामी धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दलाने मोठी पावले उचलली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फटाके आणि आवाजाच्या त्रासाबाबत नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी जिल्हा स्तरावर तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध पर्याय:

फटाके किंवा आवाजाच्या प्रदूषणाचा त्रास झाल्यास नागरिक खालील मार्गांनी आपल्या तक्रारी नोंदवू शकतात: १. संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून. २. संबंधित पोलीस ठाण्याच्या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवून. ३. ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून. ४. थेट पोलीस ठाण्यात उपस्थित राहून लिखित अथवा तोंडी तक्रार देऊन.

जिल्हा नोडल अधिकारी:

  • जिल्हा नोडल अधिकारी: पोनि भुजंग नामदेव हातमोडे
  • मोबाईल क्र.: ९१४५४८८०३८
  • ई-मेल: sp.jalna@mahapolice.gov.in

पोलीस ठाणेनिहाय नोडल अधिकाऱ्यांची यादी:

  • १. सदर बाजार: पोउपनि संतोष सुर्यभान नागरगोजे (मो.९६०४०८३६३६| pssadarbazar.jalna@mahapolice.gov.in)
  • २. तालुका जालना: पोउपनि धर्मा शिंदे (मो.८००७००३४०१ | pstaluka.jalna@nic.in)
  • ३. कदीम जालना: पोउनि गजानन निवृत्ती शिंदे (मो.९८२३३६००६७| pskadim.jalna@mahapolice.gov.in)
  • ४. चंदनझिरा: पोउपनि रवि गुलाब देशमाने (मो.९०२१४५८१४८| pschandanzira.jalna@nic.in)
  • ५. बदनापूर: पोउपनि संतोष रंगनाथ कुकलारे (मो.९७६७१०३०८८ | psbadnapur.jalna@nic.in)
  • ६. अंबड: सपोनि अमित व्यंकटेश म्हस्के (मो.७८८७३४००१३| psambad.jalna@mahapolice.gov.in)
  • ७. गोंदी: पोउपनि किरण राजेंद्र हावले (मो.९९२३९५१३९३| psgondi.jalna@mahapolice.gov.in)
  • ८. घनसावंगी: पोउपनि अजित मधुकर चाटे (मो. ८२०८५०२४०१ | psghansawangi.jalna@mahapolice.gov.in)
  • ९. तीर्थपुरी: पोउपनि संतोष तेजराव जंजाळ (मो. ९४२१८८६३७८ | pstirthpuri.jalna@mahapolice.gov.in)
  • १०. परतूर: सपोनि श्रीमती प्रतिभा आबासाहेब पठाडे (मो. ९७६५५३Nz६५३ | pspartur.jalna@mahapolice.gov.in)
  • ११. मौजपुरी: विजय सांडू तडवी (मो. ८२७५३८९२८९ | psmaujpuri.jalna@mahapolice.gov.in)
  • १२. मंठा: संतोष बालाजीराव माळगे (मो. ९५६१९३१७४० | psmantha.jalna@mahapolice.gov.in)
  • १३. आष्टी: पोउपनि किरण गंगाधर पवार (मो. ८४८५८५३३१३ | psashti.jalna@mahapolice.gov.in)
  • १४. सेवली: पोउपनि सलीम महंमद शेख (मो. ८४५३५३६४६४ | pssevli.jalna@mahapolice.gov.in)
  • १५. भोकरदन: पोउपनि सागर मनोहर शिंदे (मो. ९८९०४०८४०१ | psbhokardan.jalna@mahapolice.gov.in)
  • १६. जाफ्राबाद: पोउपनि वासुदेव रामदास पवार (मो. ९९२१०३५५२७ | psjafrabad.jalna@mahapolice.gov.in)
  • १७. टेंभुर्णी: पोउपनि बाबासाहेब शिवाजीराव खाडे (मो. ७०२०९६३२३१ | pstembhurnijalna@nic.in)
  • १८. हसनाबाद: मपोउपनि श्रीमती अर्चना दिलीप भोसले (मो. ९३५९०८५९१४ | pshasnabad.jalna@mahapolice.gov.in)
  • १९. पारध: पोउपनि वाल्मिक सुर्यभान नेमाणे (मो. ९५४५१४०९१५ | psparadh.jalna@nic.in)

त्योहार शांततेत आणि ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी जालना जिल्हा पोलिसांकडून हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

D9 News मराठी

सूचना - ((D9 News हे आधुनिक युगातील एक अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. 'D' म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आणि '9' म्हणजे नवदृष्टी! सामाजिक बांधिलकी, सत्यता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जनसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे हेच आमचे ध्येय आहे.)) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??