दिवाळी सणात फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार कुठे कराल? जालना पोलिसांकडून नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर!
By तेजराव दांडगे

दिवाळी सणात फटाक्यांच्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार कुठे कराल? जालना पोलिसांकडून नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर!
जालना: आगामी धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दलाने मोठी पावले उचलली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फटाके आणि आवाजाच्या त्रासाबाबत नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी जिल्हा स्तरावर तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध पर्याय:
फटाके किंवा आवाजाच्या प्रदूषणाचा त्रास झाल्यास नागरिक खालील मार्गांनी आपल्या तक्रारी नोंदवू शकतात: १. संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून. २. संबंधित पोलीस ठाण्याच्या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवून. ३. ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून. ४. थेट पोलीस ठाण्यात उपस्थित राहून लिखित अथवा तोंडी तक्रार देऊन.
जिल्हा नोडल अधिकारी:
- जिल्हा नोडल अधिकारी: पोनि भुजंग नामदेव हातमोडे
- मोबाईल क्र.: ९१४५४८८०३८
- ई-मेल: sp.jalna@mahapolice.gov.in
पोलीस ठाणेनिहाय नोडल अधिकाऱ्यांची यादी:
- १. सदर बाजार: पोउपनि संतोष सुर्यभान नागरगोजे (मो.९६०४०८३६३६| pssadarbazar.jalna@mahapolice.gov.in)
- २. तालुका जालना: पोउपनि धर्मा शिंदे (मो.८००७००३४०१ | pstaluka.jalna@nic.in)
- ३. कदीम जालना: पोउनि गजानन निवृत्ती शिंदे (मो.९८२३३६००६७| pskadim.jalna@mahapolice.gov.in)
- ४. चंदनझिरा: पोउपनि रवि गुलाब देशमाने (मो.९०२१४५८१४८| pschandanzira.jalna@nic.in)
- ५. बदनापूर: पोउपनि संतोष रंगनाथ कुकलारे (मो.९७६७१०३०८८ | psbadnapur.jalna@nic.in)
- ६. अंबड: सपोनि अमित व्यंकटेश म्हस्के (मो.७८८७३४००१३| psambad.jalna@mahapolice.gov.in)
- ७. गोंदी: पोउपनि किरण राजेंद्र हावले (मो.९९२३९५१३९३| psgondi.jalna@mahapolice.gov.in)
- ८. घनसावंगी: पोउपनि अजित मधुकर चाटे (मो. ८२०८५०२४०१ | psghansawangi.jalna@mahapolice.gov.in)
- ९. तीर्थपुरी: पोउपनि संतोष तेजराव जंजाळ (मो. ९४२१८८६३७८ | pstirthpuri.jalna@mahapolice.gov.in)
- १०. परतूर: सपोनि श्रीमती प्रतिभा आबासाहेब पठाडे (मो. ९७६५५३Nz६५३ | pspartur.jalna@mahapolice.gov.in)
- ११. मौजपुरी: विजय सांडू तडवी (मो. ८२७५३८९२८९ | psmaujpuri.jalna@mahapolice.gov.in)
- १२. मंठा: संतोष बालाजीराव माळगे (मो. ९५६१९३१७४० | psmantha.jalna@mahapolice.gov.in)
- १३. आष्टी: पोउपनि किरण गंगाधर पवार (मो. ८४८५८५३३१३ | psashti.jalna@mahapolice.gov.in)
- १४. सेवली: पोउपनि सलीम महंमद शेख (मो. ८४५३५३६४६४ | pssevli.jalna@mahapolice.gov.in)
- १५. भोकरदन: पोउपनि सागर मनोहर शिंदे (मो. ९८९०४०८४०१ | psbhokardan.jalna@mahapolice.gov.in)
- १६. जाफ्राबाद: पोउपनि वासुदेव रामदास पवार (मो. ९९२१०३५५२७ | psjafrabad.jalna@mahapolice.gov.in)
- १७. टेंभुर्णी: पोउपनि बाबासाहेब शिवाजीराव खाडे (मो. ७०२०९६३२३१ | pstembhurnijalna@nic.in)
- १८. हसनाबाद: मपोउपनि श्रीमती अर्चना दिलीप भोसले (मो. ९३५९०८५९१४ | pshasnabad.jalna@mahapolice.gov.in)
- १९. पारध: पोउपनि वाल्मिक सुर्यभान नेमाणे (मो. ९५४५१४०९१५ | psparadh.jalna@nic.in)
त्योहार शांततेत आणि ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी जालना जिल्हा पोलिसांकडून हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.



