या संतांच्या साहित्य संमेलनाची ! ही दिंडी निघाली चोखोबाची नामदेवाची !!
By अनिल जाधव

या संतांच्या साहित्य संमेलनाची !
ही दिंडी निघाली चोखोबाची नामदेवाची !!
नरसी नामदेव – संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या दिंडीत अध्यक्ष प्रा. विठ्ठल जायभाये यांची ताल पाऊली आणि ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्या सूर संगीताने सुरूवातीलाच संमेलन क्षितिजापार…..
बुलढाणा – नुकत्याच संतनगरी नरसी नामदेव येथे सुप्रसिद्ध संत साहित्य अभ्यासक प्रा. विठ्ठल जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली सर्वार्थ संपन्न ठरलेल्या व महाराष्ट्रभर डंका वाजलेल्या तसेच श्री. संत चोखामेळा अध्यासन केंद्र, आळंदी, पुणे, वृन्दावन फाऊंडेशन, पुणे तथा श्री. संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ व २५ ऑक्टोबर, २०२६ ला मा. इंद्रजीत काका देशमुख व इतर अनेक मान्यवर साहित्यिक मंडळींच्या उपस्थितीत मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या शुभ हस्ते उदघाटन होवून संपन्न झालेल्या तिसऱ्या संत चोखामेळा द्विदिवसीय साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच सकाळी शेकडो बाल वारकऱ्यांच्या टाळ मृदंग वीणा वाद्यवृंदासहीत काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडी मधे, दिंडी गीत गायन वादन तथा कवितेसाठी प्रसिद्ध असलेल्या हरहुन्नरी कलावंत साहित्यिक ॲड विजयकुमार कस्तुरे यांनी डफली तथा मृदंगाच्या वादनासह आपल्या पहाडी आवाजात गायिलेल्या उपरोक्त दिंडी गीताच्या सूर संगीत तालावर संमेलनाच्या अध्यक्षांनी धरलेल्या ताल पाऊलीने व सोबतच उपस्थित सहभागी मान्यवर साहित्यिक मंडळींच्या गजराने या साहित्य संमेलनाला क्षितिजाच्या पलिकडे नेले हे वास्तव या ऐतिहासिक संमेलनाचे अविस्मरणीय वैशिष्ट्य ठरले.
याप्रसंगी संत चोखामेळा अभ्यासक ज्येष्ठ कवी लक्ष्मणराव हेंबाडे, मंगळवेढा, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, शिरूर कासार, मा. भास्कर बढे, बहुजन साहित्य संघाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बबनराव महामुने इ. बरीच मंडळी उपस्थित होती.
या संमेलनात ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्या सक्रिय साहित्यिक कलागुणांसहीत सहभागाने बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विशेषत्वाने सिद्ध झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा सूर न निघाला तरच नवल अशी उत्साहवर्धक प्रतिक्रिया अक्षरविश्वात व्यक्त होत आहे



