आपला जिल्हाक्राईमक्राईम न्युजजालना जिल्हाताज्या घडामोडी

शिक्षकासह ५० जणांची कोटीहून अधिक फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार गजाआड; आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

By तेजराव दांडगे

शिक्षकासह ५० जणांची कोटीहून अधिक फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार गजाआड; आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

​जालना: मार्केटिंगमध्ये ‘बाबा ट्रेंडींग’ नावाने व्यवसाय सुरू करून, ‘बाबा ट्रेंडींग व FMCG’ कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षाला तिप्पट लाभ मिळेल, असे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारास आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपीस ५ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे.

​गुन्ह्याची पार्श्वभूमी व सविस्तर वृत्त:

​जालना शहरातील शेरसवार नगर येथील तक्रारदार मोहम्मद फेरोज अब्दुल सत्तार (व्यवसाय: शिक्षक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्यासह त्यांचे भाऊ व जवळच्या ५० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. आरोपींनी FMCG कंपनीत पैसे गुंतवण्यास भाग पाडून एकूण १,३२,०५,०००/- रुपये (१ कोटी ३२ लाख ५ हजार रुपये) रक्कमेची फसवणूक करून आरोपीत फरार झाले होते.

​या प्रकरणी दिनांक ०३/१०/22026 रोजी पोलीस ठाणे कदिम जालना येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे:

​गुन्हा नोंद: पोलीस ठाणे कदिम जालना, गुन्हा रजि. क्र. ५६४/२०२६

​कलम: ३१६(४), ३१६(५), ३१८(४), ३५१(२), ३५२, ६१(२), ३(५) BNS सह कलम ३, ४, ५ MPID कायदा.

​या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखा, जालना मार्फत सुरू आहे.

​पोलिसांची कारवाई व अटक सत्र:

​गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार फरार होता आणि तो मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचा ठावठिकाणा मिळवणे कठीण झाले होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीत मो. एजाज मो. रफिक सलाट हा बांद्रा, मुंबई येथे असल्याची माहिती मिळवली.

​वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा येथील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या पथकाची मदत घेऊन पोलिसांनी रात्री १:०० वाजता मुख्य आरोपीत एजाज सलाट यास यशस्वीरीत्या जेरबंद केले. त्यास जालना येथे आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीताची ५ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे.

​यापूर्वी या प्रकरणात इतर दोन आरोपीतांना दिनांक ०७/१०/२०२६ रोजी अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत:

१. वसिम अहेमद अब्दुल गफार (वय ३७ वर्षे, रा. इतवार गल्ली, जुना जालना)

२. मोहम्मद युनुस अहेमद मोहम्मद सलीम (वय ३४ वर्षे, रा. इतवार गल्ली, जुना जालना)

​पोलिसांचे नागरिकांना आवाहन:

​गुन्ह्यातील आरोपीतांनी नागरिकांना तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे अशा फसवणुकीस बळी पडलेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्या कोणी नागरिकांनी या कंपनीत गुंतवणूक केली असेल, त्यांनी त्वरित आर्थिक गुन्हे शाखा, जालना येथे येऊन आपला तक्रारी अर्ज सादर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

​कारवाई करणारे पथक:

​सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक तेघबिरसिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी, आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली;

सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, तसेच पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, गोविंद दराडे आणि महिला अंमलदार मंदा नाटकर यांच्या पथकाने पार पाडली आहे.

D9 News मराठी

सूचना - ((D9 News हे आधुनिक युगातील एक अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. 'D' म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आणि '9' म्हणजे नवदृष्टी! सामाजिक बांधिलकी, सत्यता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जनसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे हेच आमचे ध्येय आहे.)) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??