Breaking

राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपदी शंकर बैसाने

राष्ट्रवादीचे संघटना भक्कम होत असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा…अमळनेर-(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी शंकर बंडू बैसाणे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली,राष्ट्रवादीच्या सर्व विभाग व आघाड्यांवर जनसंपर्क असलेले क्रियाशील पदाधिकारी
त्यांच्या नियुक्त होत असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत होत असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यानी व्यक्त केली.
शंकर बैसाणे हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते असून उत्तम जनसंपर्क त्यांचा आहे,त्यांच्या पत्नी सौ ललिताताई बैसाणे यांनी अमळनेर प स चे सभापतीपद देखील भूषविले आहे,त्यांचे कार्य पाहूनच हि संधी त्यांना मिळाली असून सदर नियुक्तीबद्दल जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील,माजी मंत्री आ सतिश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील,सौ तिलोत्तमा पाटील,विधानस भाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील मुक्तार खाटीक,मार्केट संचालक विजय प्रभाकर पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

D9 News मराठी

सूचना - ((D9 News हे आधुनिक युगातील एक अग्रगण्य डिजिटल न्यूज पोर्टल आहे. 'D' म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आणि '9' म्हणजे नवदृष्टी! सामाजिक बांधिलकी, सत्यता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जनसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे हेच आमचे ध्येय आहे.)) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??