अमळनेर प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा “प्रताप”…
अमळनेर (सूत्र) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात रविवारी सकाळी ११:३० सुमारास जादा तास करीता आलेल्या विद्यार्थीवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर प्रताप महाविद्यालयात ३ विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांची रॅगिंग करून त्याला हातात काठी धरून मारहाण करू अशी चिथावणी देत त्या विद्यार्थ्यांची व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले.
सदर या प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ३ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थीने सिनेस्टाईल सारखे कृत्य करून तिसऱ्याने चित्रीकरण केले. या घटनेनंतर त्या ३ विद्यार्थ्यांच्या तावडीतून सुटका करीत त्या पिडीत विद्यार्थ्याने महाविद्यालयातून पळ काढला. घरी आल्यावर घडलेली घटना त्याने आपल्या पालकांना आप बिती सांगितले. त्यावेळी त्याच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी महाविद्यालयातील वरिष्ठांना रॅगिंग झाल्याबाबत तक्रार देऊन सर्व हकीकत सांगितली. परंतु अद्याप अजून कुठलीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाहीत. तरी काय कारवाई होते याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
रॅगिंगच्या या प्रकारामुळे प्रताप महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे. खबरीलाल च्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती तसेच पुरावा ही हाती लागला आहे.
कायदा काय म्हणतो….
महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम,१९९९
४.रॅगिंग करण्याबद्दल शास्ती-.रॅगिंग करण्याबद्दल शास्ती.- जी कोणी, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये हवा तिच्याबाहेर प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग करत असेल, त्यात भाग घेत त्यास अपप्रेरणा देत असेल, किंवा त्याचा प्रचार करत असेल तर,त्यासअपराधसिद्धीनंतर,दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा
होईल आणि दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची देखील शिक्षा
होण्यास ती पात्र असेल.
६.विद्यार्थ्याला निलंबित करणे.-(१) जेव्हा कोणताही विद्यार्थी किंवा यथास्थिती,आईवडील, पालक,किंवा शैक्षणिक संस्थेचा शिक्षक,शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे रॅगिंगची लेखी तक्रार करील तर, त्या शैक्षणिक संस्थेचा प्रमुख,पूर्वगामी तरतुदींना बाध न आणता,तक्रार मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत तक्रारीमध्ये नमूद केलेल्या प्रकरणाची चौकशी करील आणि जर, प्रथमदर्शनी, ती खरी असल्याचे आढळून आल्यास,अपराधाचा आरोप असलेल्या विद्यार्थ्याला निलंबित करील आणि ती शैक्षणिक संस्था ज्या क्षेत्रा मध्ये असेल त्या क्षेत्रावर अधिकारीता असलेल्या पोलीस ठाण्याकडे तक्रार पुढील कार्यवाहीसाठी त्वरित पाठवतील.
संस्था,प्राचार्य ने कारवाई न केल्यास…..
७.अपप्रेरणा दिल्याचे मानणे.- रॅगिंगची तक्रार केली असताना,शैक्षणिक संस्थेचा प्रमुख कलम ६ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने कारवाई करण्यात कसूर किंवा हयगय करील तर,रॅगिंग सारख्या अपराधाला अशा व्यक्तीने अपप्रेरणा दिल्याचे मानले जाईल.आणि अपरासिद्धीनंतर कलम ४ मध्ये तरतूद केल्याप्रामणे तिला/त्याला शिक्षा करण्यात येईल.