आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे
जालना तालूक्यातील अतिवृष्टीने बाधीत गावाची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल बाधीत गावाची पाहणी
By तेजराव दांडगे

जालना तालूक्यातील अतिवृष्टीने बाधीत गावाची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल बाधीत गावाची पाहणी
जालना, दि. 22 : जालना तालूक्यातील सेवली मंडळात काल रात्री सुमारे 65 मि.मी. पाऊस पडला. यामुळे सेवली मंडळातील उखळी येथील पाझर तलाव अतिवृष्टीने फुटल्याने याठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
त्याअनुषंगाने आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी आज जालना तालूक्यातील विरेगाव, सेवली व नेर मंडळाचा दौरा करुन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन, संबधीतांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांशी संवाद साधुन शासन प्रशासन आपणांस सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी जालना रामदास दौंड, तहसीलदार जालना श्रीमती छाया पवार आदींची उपस्थिती होती.



