आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी
By गौतम वाघ

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी
जालना, दि. २८: जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रावार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार अनिल नव्हाते, नायब तहसीलदार श्री तायडे, नायब तहसीलदार तुषार निकम, सा.महसूल अधिकारी रवींद्र हेलगट, सा. महसूल अधिकारी अतुल केदार, दिनेश बेराड यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.