स्वातंत्र्य सैनिकांची तुलना कुत्र्यांशी करणाऱ्या काँग्रेस चे खरगे यांची बुद्धी भ्रष्ट झाली काय..? -जिल्हाध्यक्ष उदय वाघ
स्वातंत्र्य लढा हा एक विचार व चळवळ,त्यात सर्वांचेच योगदान,काँग्रेसला उगाच भांडवल न करण्याचा दिला सल्लाअमळनेर-काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाजपा व संघाचे कुत्रेही मेले नाही असे विचित्र वक्तव्य करून एकप्रकारे थोर स्वातंत्र्य सेनानींचा संबध कुत्र्यांशी जोडून अपमानच केला आहे,यामुळे भाजपातर्फे त्यांचा जाहीर निषेध असून खरगे यांनी आधी इतिहास जाणून घ्यावा,त्यावेळी जो स्वातंत्र्य लढा झाला ती एक चळवळ आणि विचार होता,त्यात प्रत्येक जण या भूमीचापुत्र म्हणूनच सहभागी झाला होता,पक्ष म्हणून तर मुळीच संबध नव्हता,यामुळे काँग्रेसने उगाच स्वातंत्र्य लढ्याचे भांडवल मुळीच करू नये असा सल्ला भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी लेखी पत्रान्वये दिला आहे.
सदर पत्रात त्यांनी म्हटले आहे की डॉ हेडगेवार सह संघ परीवाराच्या विचारांच्या असंख्य मंडळींनी स्वातंत्र लढ्यात योगदान दिल्याची नोंद इतिहासात आहे,आणि खरे म्हणजे तेव्हाची काँग्रेस ही देशभक्तीने प्रेरित होती आणि आजची काँग्रेस कोणत्या हेतूने प्रेरित आहे हे मुळीच सांगण्याची गरज नाही,प्रत्यक्षात स्वातंत्र्य लढ्यासाठी काही थोर सेनानी एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेस या विचारधारेतून जनतेला संघटित करून स्वातंत्र्याची लढाई जिंकली,स्वातंत्र्यानंतर मात्र म. गांधींनी काँग्रेस बरखास्त करण्याची इच्छा व्यक्त केली.मात्र काही सत्तापिपासुना काँग्रेस या ब्रँड नेमचा फायदा घेऊन राजकारण करायचे असल्याने त्यांनी काँग्रेस हे नाव हस्तगत करून या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला,यामुळे या काँग्रेसचा स्वातंत्र्य लढ्याशी कोणताही संबध मुळीच नाही, तसेच स्व इंदिरा गांधी आणि स्व राजीव गांधी यांच्या हत्या देशासाठी दुर्देवी असल्या तरी त्या घटना स्वातंत्र्य लढ्यानंतर घडलेल्या आहेत,याचीही जाण काँग्रेस नेत्यांनी ठेवावी,याउलट काँग्रेसची मंडळी ज्या लोकमान्य टिळक आणि वि. दा. सावरकर यांच्या सारख्या महापुरुषांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेले असताना हि मंडळी हे मात्र मान्य करीत नाही हेच खरे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.काँग्रेस चे जवाबदार पदाधिकारी आता सत्तेच्या लालसेपोटी अशी बेजवाबदार वक्तव्ये करीत असल्याने आता खऱ्या अर्थाने त्यांना मतदारांच उत्तरे देतील.
भारतीय जनता पार्टीने आज जनतेच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत विश्वासर्ह्यता दुपटीने वाढली आहे,यामुळे अशी कितीही बेजबाबदार वक्तव्ये काँग्रेस नेत्यांनी केली तरी त्याचा जमतेवर कोणताही परिणाम होणार नाही,आणि भाजपाचा १०० टक्के बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात तर मुळीच फरक पडणार नाही.असा दावा देखील उदय वाघ यांनी केला आहे.