बैलपोळ्यानिमित्त कोळेगावात रंगला कुस्त्यांचा थरार; मुलींनीही मारली बाजी!
By गौतम वाघ

बैलपोळ्यानिमित्त कोळेगावात रंगला कुस्त्यांचा थरार; मुलींनीही मारली बाजी!
कोळेगाव (ता. भोकरदन, जि. जालना) येथे २३ ऑगस्ट २०२५ रोजी भैरवनाथ महाराज पाडव्याच्या निमित्ताने कुस्त्यांचा भव्य आखाडा भरवण्यात आला. या पाडव्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि नवस फेडले. याच उत्साहात तरुणांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या कुस्ती स्पर्धेत शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसह बाहेरून आलेल्या पैलवानांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, मुलांच्या बरोबरीने मुलींनीही या कुस्त्यांमध्ये बाजी मारत सर्वांची मनं जिंकली. भाग्यश्री दशरथ दोड आणि तुला मिसाळ या दोन्ही मुलींनी आपल्या दमदार लढतींनी उपस्थितांना थक्क केले. या मुलींनी ज्ञानेश्वर घनवट सरांच्या मार्गदर्शनाखाली तालमीचा सराव केला होता.
संस्थेच्या वतीने सहभागी झालेल्या शालेय मुलांना भविष्यात उपयोगी पडतील अशी प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रविराज गावंडे, सरपंच गजानन गावंडे, माजी सरपंच पंडित गावंडे, माजी सरपंच पुंडलिक गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, भागवत गावंडे, रामधन सुसर, अवचितराव गावंडे, कैलास गावंडे, चंद्रकांत गावंडे, कौतिक सौन्नी यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील कड, केशव पाटील जंजाळ, जिल्हा रिपोर्टर गौतम वाघ, आणि घनवट सर उपस्थित होते. या मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वाढवला.