Breaking
अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांची भेट व वृक्षारोपण…!
अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी भेट देऊन नव्याने बनविण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाची पहानी केली व शाळेच्या आवारात राबविल्या जाणाऱ्या सुमारे दोनशे वृक्षांच्या लागवड कार्यक्रमाची सुरूवात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आली.
यावेळी शाळेच्या माध्यमातुन क्रिडा शिक्षणासाठी दिल्या जाणार्या सुविधांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी क्रिडा विभागाचे एन के पाटील, संस्थेचे सचिव प्रा शाम पाटील,संचालक पराग पाटील,प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी,क्रिडाशिक्षक व्हि एन सुर्यवंशी,केदार देशमुख,महेश पाटील,मनोज बिऱ्हाडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.