उघड्यावर फेकलेल्या गायीचा पतंजली योगसमितीच्या कार्यकर्त्यानी केला दफनविधी
अमळनेर-शहरापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर मारवड रस्त्यावर असलेल्या बर्डे हनुमान मंदिराजवळ कोणी अज्ञात इसमाने मृत झालेल्या गाईस उघड्यावर फेकुन दिलेले असताना पतंजली योग समितीचे योग् प्रचारक कमलेश आर्य व कार्यकर्त्यानी या गायीचा विधिवत दफनविधी करून माणुसकीचे दर्शन घडविले.
या स्तुत्य कार्यासाठी त्यांना अमळनेर येथील जाधव इंग्लिश क्लासेस चे संचालक विनोद जाधव यांनी जेसीबी उपलब्ध करून दिल्याने त्वरित दफनविधीची क्रिया पार पडली.याकामी कौशल दिलीपसिंग परदेशी, भावेश विजय शेजवळ,कुलदीप योगेश खोरे यांचे अनमोल योगदान लाभले.दरम्यान बऱ्याचदा काही जण मृत झालेल्या गाई व इतर पशुधन मृत झाल्यानंतर उघड्यावर टाकून देत असतात,त्यामुळे अशा पशुधनाची इतर प्राण्यांकडून लचके तोडले जातात तसेच रोगराई चा देखील प्रादुर्भाव होत असतो, यामुळे मृत गाय अथवा पशुधन उघड्यावर न टाकता दफनच करावे असे आवाहन कमलेश आर्य यांनी केले आहे.