नाट्यकलावंत रवि लोखंडे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार
By तेजराव दांडगे

नाट्यकलावंत रवि लोखंडे यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार
पारध (प्रतिनिधी):भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, पत्रकार तथा नाट्य कलावंत रवि लोखंडे आणि त्यांच्या संचाचा जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जालना जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनी ’अमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम आणि महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण ‘ दोन विषयांवर महाराष्ट्र स्तरीय रिल्स कॉम्पिटिशन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत रवी लोखंडे लिखिती,दिग्दर्शित व अभिनित रिल्स सादर केली होती.यात जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध रिल्सस्टार योगेश गोरे(सोनूचे पप्पा),शिवकन्या गोरे(सोनुची मम्मी), गजानन महाले आणि रवी लोखंडे यांनी भूमिका केल्या.या स्पर्धेचा निकाल सोमवार (दि.१५)रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते या संचाच्या सर्व कलाकारांना सहभागी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.



