पुणे (हडपसर) : पुणे या ठिकाणी वाहनं चालवणं म्हणजे फार तारेवरची कसरत त्यात नियम जर का वेशीला टांगला मग तर कल्याण. हिच आपण बातमीत पाहूयात.
वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे पुणे आणि ट्रॅफिक आता एक समीकरण बनलं आहे. पुणे शहरातील वाहतुकीची शिस्त दिवसेंदिवस बिघडताना दिसतेय. अनेकदा पुण्यात फिरायचं म्हणजे लोकांना मोठा प्रश्न पडतो की, फिरण्यासाठी मोकळा रस्ता नेमका कुठला असेल? आधी याचा विचार पडतो.
पण हडपसर मध्ये झाले भलतेच इथे बाईकचालक तर नियम धाब्यावर बसवूनच वाहन चालवतात सध्या सोशल मीडियावर पुण्यातील हडपसरमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका जोडप्याने वाहतूक नियमांची अक्षरश: चिंधड्या उडवल्या आहेत.
बेभान बाईक चालकाची एक चूक बेतू शकली असती जीवावर.. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह..
अक्षरशा हायवेवर जोडपं ज्या पद्धतीने बाईक चालवतंय ते पाहता, यांना जीव महत्त्वाचा नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण- हे जोडपं बाईक चालवताना वापरत असलेली पद्धत आणि मार्गिका अतिशय चुकीची असल्याचं दिसत आहे. वायरल झालेला व्हिडीओ पाहतानाही भीतीदायक वाटतोय. कारण- चुकूनही एखाद्या वाहनाची धडक बसली असती, भीषण अपघाताची घटना घडली आहे असती.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं महामार्गावरून भरधाव बाईकनं जात आहे; पण बाईक सरळ उलट्या मार्गानं वेगानं पळवत नेली जात आहे, महामार्ग असल्यानं समोरूनही वेगाने वाहनं येत आहेत, मात्र जीवाची पर्वा न करता ते जोडपं या सर्व वाहनांतून रस्ता काढून वेगाने उलट दिशेनं पुढे जातायत. यावेळी एकही चूक जीवावर बेतू शकली असती; मात्र त्याची पर्वा न करता बाईकस्वार आरामात जाताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे बाजूने एक आरटीओची कारदेखील पास होते; मात्र त्यांचेही या प्रकाराकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुणे पोलीस आहात कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून लोकांनी पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
पुण्यातील हडपसर रस्त्यावरील हा व्हिडीओ @chal_pune नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, हडपसर येथील पुलावरून एक दुचाकीस्वार बिनधास्तपणे विरुद्ध लेनमधून गाडी चालवत होता. समोरून RTO ची गाडीसुद्धा येताना दिसते, परंतु त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले. कदाचित याच कारणामुळे पुण्यात ट्रॅफिकचे नियम कोण पाळत नसावं…!
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??