राजर्षी शाहू विद्यालयात आनंद नगरी मोठ्या उत्साहात संपन्न
By तेजराव दांडगे
राजर्षी शाहू विद्यालयात आनंद नगरी मोठ्या उत्साहात संपन्न
पारध, दि. 04: राजर्षी शाहू विद्यालय, पारध मध्ये आनंद नगरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आनंद नगरी चे उदघाटन प्राचार्य राजाराम डोईफोडे व शालेय समिती चे अध्यक्ष विनोद लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले. विद्यार्थ्यांनी 37 प्रकारचे स्टॉल याप्रसंगी लावले. या स्टॉलमध्ये पाणीपुरी, भेळ, भजे, पाववडा, पापड, आपे, इडली, गुलाब जामुन, समोसा, पेरू, पॉपकॉर्न, चहा, पोहे,चिप्स पाकीट, कचोरी, व्हेज बिर्याणी, पोंगे,चॉकलेट असे विविध प्रकार चे स्टॉल होते. या स्टॉल मधून विद्यार्थ्यांना व्यवसायिक ज्ञान प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी 17,385 रुपयांचा व्यवसाय यामधून केला. या प्रसंगी मुख्याध्यापक विलास लोखंडे, उपप्राचार्य अमोल बांडगे, उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, निलेश लोखंडे, अधीक्षक किशोर वाघ, ज्ञानेश्वर अल्हाट, विवेक पऱ्हाड, स्वप्नील वाघ, भागवत पानपाटील, गजानन लोखंडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.