ऐतिहासिक पारध नगरीत जनमेजयराजे भोसले आणि शिवाजीराजे जाधव यांचे अभूतपूर्व स्वागत!
By तेजराव दांडगे/कृष्णा लोखंडे

ऐतिहासिक पारध नगरीत जनमेजयराजे भोसले आणि शिवाजीराजे जाधव यांचे अभूतपूर्व स्वागत!
मातृभूमी पारध नगरीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनमेजयराजे भोसले आणि राजमाता जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
पारध, दि. 26: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध नगरी आज एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट चे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, आणि राजमाता जिजाऊ यांचे थेट वंशज, शिवाजीराजे जाधव सिंदखेड राजा, यांनी मातृभूमी पारध नगरीला भेट दिली. या भेटीनिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट चे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांचे थेट वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या शुभहस्ते येथील ऐतिहासिक गढीवर भगवा ध्वज दिमाखाने फडकवण्यात आला.
जनमेजयराजे भोसले आणि शिवाजीराजे जाधव यांचे जय स्तंभ चौक, जुनी गढी, महात्मा ज्योतिबा फुले नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर तसेच ग्रामपंचायत कार्यालय आदी वेगवेगळ्या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी, गावातील महिला, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कार्यालय आणि पत्रकार बांधवांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. संपूर्ण गावात रस्तोरस्ती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, ज्यामुळे गावाचे सौंदर्य अधिकच खुलले होते आणि या पाहुण्यांचे स्वागत अधिकच दिमाखदार झाले.
या भेटीमुळे पारध नगरीतील नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्याची माहिती आणि राजमाता जिजाऊंच्या वंशजांचे दर्शन यामुळे गावातील प्रत्येक चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. हा दिवस पारध नगरीच्या इतिहासात एका अविस्मरणीय क्षणात नोंदवला गेला.