तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्काराने मयुर बागुल यांना सन्मानीत…..
कृष्णाजी चरिटेबल फाउंडेशन, मुंबई विविध सामाजिक उपक्रम समाजात राबवीत असते. सामजिक क्षेत्रात संस्थेच्या अंतर्गत आजवर अनेक शैक्षणिक, आरोग्य या मध्ये कार्य करत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजरत्न यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचे मानस संस्थेने ठरवला होता.
या वर्षीचा “तेजोमय समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०१८ मयुर बाळकृष्ण बागुल यांना प्रदान करण्यात आला”.
सदरील पुरस्कार मा. खा. आनंदराव अडसूळ (सदस्य – भारतीय संसद), मा. श्री. संजीव पाळंदे (सेक्रेटरी – संस्कृती विभाग – महाराष्ट्र राज्य), मा. मेघा धाडे (मराठी बिग बॉस – विजेत्या कलाकार) व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. कृष्णाजी चरिटेबल फाउंडेशनच्या डॉ. विनाताई त्यागराज यांनी पुरस्कार देण्यामागील उद्देश सांगताना म्हटले की पुरस्कार ही काम करण्यासाठी प्रेरणा देत असते आणि त्यामुळे जोमाने अधिक जबाबदारीने समाजात कार्य घडत असते.
कुटुंबात सामजिक संस्कार घडल्यामुळे आपण समाजचे देणे लागतो. स्वता पुरता जीवन जगत असतांना आपण दुसऱ्यांच्या देखील विचार केला पाहिजे. देशात व समाजत प्रगती घडवायची असेल तर निसंकोच पणे कार्य केले पाहिजे हि जिद्द व इच्छाशक्ती असल्याने त्यांचे कार्य वाढत आहे. समाजकार्य क्षेत्रात गेली आठ वर्षापासून विविध सामजिक संस्था ह्यांच्या सोबत काम करत असतांना विशेषतः ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे या उद्देशाने त्यांनी चार वर्षापासून ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, जन – जागृती सारखे उपक्रम सुरु केले. समाजात बदल व परिवर्तन घडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणत कार्यारत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होणे अपेक्षित होते. पुरस्कार स्वीकारतांना हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेऊन सोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. कुठलेच कार्य पुरस्कार घेण्यासाठी करत नाही परंतु आपल्यावर लोकांचा विश्वास असल्याने व समाजात चांगले परिवर्तन व बदल घडवून आणण्याची अपेक्षा असते त्यामुळे पुरस्कार घेऊन अधिक जबाबदारीने कार्य करण्यास पाठबळ मिळते.