पारध येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न
By तेजराव दांडगे
पारध येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न
पारध, दि.10: भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे स्व. शरदचंद्रजी हिरालालजी श्रीवास्तव यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्व. हरिवंशराय बच्चन सेवाभावी संस्था पारध बु, लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रिडा मंडळ, लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) चिखलठाणा संचलीत तसेच स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय पारध बु आणि लायन्स नेत्र रुग्णालय औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन बालू दादा लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 246 पेशंची नेत्र तपासणी करण्यात आली असून 325 पेशंटची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नोंद घेण्यात आली. लायन्स नेत्र रुग्णालय सिडको N-1 छ्त्रपती संभाजी नगर (camp) नेत्र तपासणी टीममधील 1) डॉ. एस. एस. गायकवाड, 2) डॉ. मंगेश देशमुख, 3) असिस्टंट, सुजाता भुई, 4) असिस्टंट, विशाल देवरे यांनी केली.
यावेळी जि. प. माजी सभापती मनीष श्रीवास्तव, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, विक्रांत श्रीवास्तव, बालु लोखंडे, जगदीश लोखंडे, गणेश लोखंडे, हरिभाऊ तबडे, पत्रकार रवींद्र लोखंडे, गजानन देशमुख, रामसिंग ठाकूर, रमेश जाधव, शकील अहेमद, तेजराव दांडगे, तुळशीराम लोखंडे, विष्णू देशमुख, जगन लोखंडे, बाबुराव काकफळे, गणेश लोखंडे, समीर पठाण, नारायण लोखंडे, गणेश जागीरदार, काशिनाथ अल्हाट, भास्कर सरोदे, पांडुरंग जाधव, शेख सादीक, पारध ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.