शिक्षण
विद्यार्थ्यांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी : प्राचार्य दत्तात्रय जाधव..
साधना विद्यालयात वीर बाल दिवस साजरा.
पुणे (हडपसर) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्त व क्रांतीकारक यांनी प्राणांचे बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात बालकांचा देखील सहभाग होता.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुघलराजवटीत औरंगजेब व शीख संघर्ष काळात शिखांचे धर्मगुरू गुरूगोविंदसिंग यांची ६ व ८ वर्षांची वीर बालके जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांनी देश व धर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. व इतिहासात अजरामर ठरले.
विद्यार्थांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे वीर बाल दिवस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यालयातील कला शिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी शौर्यगीत सादर केले.या निमित्ताने सार्थक शिंदे व सूरज चव्हाण या
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिन कुंभार यांनी शिक्षक मनोगतात वीर बाल दिवस का साजरा करतात व बलिदानविषयक संपूर्ण माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत, आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, गजेंद्र शिंदे, धनाजी सावंत सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पाषाणकर यानी केले. सूत्रसंचालन दिपाली गावंडे यांनी केले. तर आभार अश्विनी कुलकर्णी यांनी मानले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.