सुनिल थोरात (हवेली)
पुणे हवेली : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला पुणे सोलापूर रोड, कदमवकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाक्याजवळ शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा १४ किलो १८२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलीस व पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक १ च्या पोलिसांनी एकत्रित केली.
साहिल विनायक जगताप (वय-28, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक-1 व लोणी काळभोर पोलीस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पोलिसांना लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी गांजाची तस्करी होणार अशी माहिती खबऱ्यामार्फत मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी साहिल जगताप याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा सुमारे १४ किलो १८२ ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी याप्रकरणी साहिल जगताप याला तात्काळ अटक केली असून त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलम 8 (क), 20 (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बालाजी बांगर, ईश्वर भगत यांच्या पथकाने यशस्वी पणे पार पाडली.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??