कला आणि विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संपन्न…

सुनिल थोरात (प्रतिनिधी)
पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कला आणि विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यालयातील नर्सरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींना इयत्ता निहाय विविध विषय देण्यात आले होते.
त्यानुसार विद्यार्थिनींनी वेगवेगळे आणि आकर्षक प्रकल्प बनवून आणले होते. यामध्ये कला विभागात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी आइस्क्रीमच्या काड्या , लोकरीपासून बनवलेल्या वस्तू होत्या. विज्ञान विभागात माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी हायड्राॅलिक लिफ्ट , हायड्राॅलिक क्रेन , गवत कापण्याचे यंत्र, गणितीय उपकरणे , शैक्षणिक साहित्य यासारखे विविध यंत्र आणि प्रतिकृती तयार केल्या होत्या.
प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. सर्व पालकांनी या प्रदर्शनास उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमांसाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. झीनत सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. जयश्री पलंगे व सौ. हर्षा साळुंखे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.