म्हसले येथे आमदार शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शिवरायांच्या भव्य स्मारकाचे थाटात लोकार्पण..
अमळनेर( प्रतिनिधी)महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम,शेतीला पाणी आणि प्रामुख्याने अमळनेर मतदार संघाचा विकास हे ध्येय आपले असून त्यादिशेनेच आपली वाटचाल सुरु आहे,आज लोक काही इतर मोठ्या शहराच्या विकासाबाबत चर्चा करतात,परंतु अशीच भक्कम साथ आम्हाला भविष्यात देखील राहिल्यास निश्चितपणे अमळनेर मतदार संघाच्या विकासाची चर्चा सर्वत्र राहील असा विश्वास आ शिरीष चौधरी यांनी अमळनेर तालुक्यातील म्हसले येथे आयोजित लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केला.
आ.चौधरी यांनी म्हसले येथे नवतरुणांच्या इच्छापूर्तीसाठी स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य असे स्मारक उभारल्याने या स्मारकाचे आ.चौधरींच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले.तसेच ७ लाख निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन ही आमदारांच्या हस्ते झाले, कार्यक्रम प्रसंगी सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, किरण गोसावी, राजेंद्र पाटील,नगरसेवक श्याम पाटील, रमेश पाटील,रोशन सोनवणे,गजानन पाटील, विजय पाटील, संतोष लोहार, आनंदसिंग पाटील, गुलाब आगळे, हेमंत चौधरी, मंगेश पाटील, अरुण पवार, शिवस्मारकाचे ठेकेदार फारुख मिस्तरी व तारीख पठाण उपस्थित होते .याप्रसंगी म्हसले येथे शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरलेल्या शेती उपयोगी रस्त्याचे खडीकरण होऊन मोठी सोय झाल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार मानले. यावेळी आ. चौधरी यांनी मनोगतात गेल्या चार वर्षांपासून केलेल्या विकास कामाबाबत माहिती दिली तसेच हिरा उद्योग समुहाच्या माध्यमातून अनेक गावांच्या सिंचनाचे प्रश्न सुटले आहेत असे सांगितले, गावोगावी शिवरायांचे आदर्श मावळे घडावेत यासाठीच शिवस्मरकांचे निर्माण आपण करीत असल्याचे सांगून आता केवळ पुढील काळात आपण मतदार रुपी प्रेम माझ्या वर असू द्याल एवढीच अपेक्षा असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. तसेच १०३ कोटी रुपयांच्या म्हसले-अमळनेर- बेटावद रस्ताचा कामाला सुरुवात झाल्याने व आमदार शिरीष चौधरी यांच्या स्व खर्चातून म्हसले गावात नाला खोलीकरण झाल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील सरपंच अधिकार पाटील, सुभाष पाटील, भरत पाटील, दीपक पाटील, नाना पाटील, प्रवीण पाटील, मुकुंदा पाटील,रामचंद्र पाटील, भूषण पाटील,कैलास पाटील, वना साळुंखे, शरद पाटील, रावसाहेब पाटील, संदीप पाटील, बाळू पाटील यांनी परिश्रम घेतले तर अरविंद भामरे सूत्रसंचालन व आभार मानले.