घरभाड्याच्या वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला, आरोपीत अटक
By तेजराव दांडगे

घरभाड्याच्या वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला, आरोपीत अटक
पारध, दि. 03: भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे घरभाड्याच्या वादातून एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अमोल उर्फ गोट्या साहेबराव गुजर (रा. शेलूद) असे आरोपीताचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पर्वताबाई पिराजी गायकवाड (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अमोल गुजर याने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पर्वताबाई या अमोलच्या वडिलांच्या नातेवाईक असून त्या घरात उपस्थित होत्या. अमोलने घर भाड्याने दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून अमोलने पर्वताबाई यांच्यावर हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पर्वताबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमोल गुजर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेमुळे शेलूद परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.