जळगाव सपकाळ शाळेचे ‘कब’ परीक्षेत घवघवीत यश: राष्ट्रीय ‘सुवर्णबाण’ परीक्षेसाठी १२ विद्यार्थी पात्र!
By गोकुळ सपकाळ

जळगाव सपकाळ शाळेचे ‘कब’ परीक्षेत घवघवीत यश: राष्ट्रीय ‘सुवर्णबाण’ परीक्षेसाठी १२ विद्यार्थी पात्र!
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जळगाव सपकाळने नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय कब-बुलबुल परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातून एकमेव ही शाळा आहे जिथे ‘कब’ विभागातील एकूण १२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चतुर्थचरण कब परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
या घवघवीत यशाबद्दल जालना भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेने शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे पत्राद्वारे कौतुक केले आहे. या यशामुळे, हे यशस्वी विद्यार्थी आता राष्ट्रीय सुवर्णबाण कब परीक्षेत बसण्यास पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे: ओम शिवाजी सपकाळ, स्वराज संदीप नेमाने, चेतन सतीश हिवाळे, साई विशाल पवार, साई सोमिनाथ वरपे, सुमित विलास गिरी, आदित्य संजय फुके, प्रथमेश संजय अवघडकर, प्रवीण शिवाजी गावंडे, साईराज मोहन सपकाळ, साई सुनील रोजेकर आणि साई सचिन श्रीवास्तव.
जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नेहमीच शालेय आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय असते. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, तालुका गटसमन्वयक नेव्हार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळ सपकाळ, उपाध्यक्ष रामेश्वर दौड आणि सर्व सदस्य, केंद्रप्रमुख बी.यू. सपकाळ, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिताताई सपकाळ, सरपंच कु. विशाखाताई साळवे, उपसरपंच श्रीमती रुखमनताई सपकाळ, पांडुरंग सपकाळ, गोकुळराजे सपकाळ, तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्ह्यातील अनेक शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नासेर शेख, अशोक आराक, कबमास्टर सुभाष साबळे, विजय पंडित, अनिल सपकाळ, नितीन बाहेकर, रुपेश टाकळकर, भीमराव गायकवाड, भिकन लोखंडे, देवेंद्र बकाल, श्रीमती सुरेखा मिसाळ मॅडम, श्रीमती मानसी देशमुख मॅडम, श्रीमती अनिता लोखंडे मॅडम, श्रीमती अश्विनी वाघ मॅडम, श्रीमती भेंडाळे मॅडम आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.