दिव्यांगांसाठी मोफत अवयव वाटप शिबीर, स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आयोजन
By तेजराव दांडगे

दिव्यांगांसाठी मोफत अवयव वाटप शिबीर, स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आयोजन
पारध, दि. 04 : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या २३ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, स्व. हरिबंशराय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पारध, लाला बहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ, पारध आणि साधु वासवाणी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी एका भव्य मोफत अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्व. राजेंद्रजी हिरालालजी श्रीवास्तव यांच्या स्मरणार्थ आयोजित केले जात आहे.
या शिबिरात कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसवण्याचे काम मोफत केले जाईल. विशेषतः अस्थिभंग व्यक्तीकरिता उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, ज्यांना हातोळी, पाय किंवा इतर अवयव नाहीत, त्यांना हे अवयव बसवण्यासाठी मोफत मदत दिली जाईल.
स्थळ: स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव वरिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश स्कूल, पारध (शाहूराजा), बु. ता. भोकरदन, जि. जालना.
वेळ: रविवार, दि. 15/06/2025 रोजी सकाळी ९ ते २ पर्यंत.
या शिबिराचे आयोजक मनीष श्रीवास्तव (शिवसेना उपजिल्हा प्रमूख, जालना. उद्धव बाळासाहेब ठाकरे)
नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक: ९८९०१०५५८९ / ९७३०६६२७४३ / ९५५२९८१४५७ / ८०८०४४५२६० / ९७६७४७१३०९ / ९८२२०२७९९९ / ९४२२७२४३१९ / ९४२२७२४३९९
या शिबिरास ग्रामपंचायत पारध विविध कार्यकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.