आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
भोकरदन येथे विशेष घटक प्रशिक्षण संपन्न; पशुसंवर्धन तज्ञांचे मार्गदर्शन
By देवानंद बोर्डे

भोकरदन येथे विशेष घटक प्रशिक्षण संपन्न; पशुसंवर्धन तज्ञांचे मार्गदर्शन
भोकरदन, (जालना) : भोकरदन येथे विशेष घटक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांच्या हस्ते झाले.
या प्रशिक्षणात पशुसंवर्धन विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुनील फुंने (सहा. आयुक्त, भोकरदन), डॉ. उत्कर्ष वानखेडे (प.वि.अ विस्तार, भोकरदन), डॉ. वाघमारे, डॉ. मुंडे, आणि डॉ. लाड यांनी पशुसंवर्धन विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प. प. डॉ. जोगदंड, डॉ. जोशी, डॉ. पवार, डॉ. फुके, डॉ. देवानंद बोर्डे, डॉ. आण्णा सोनूने आणि इतर संस्था प्रमुख उपस्थित होते.
या प्रशिक्षणात पशुपालकांना पशुसंवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांची काळजी, आणि विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाचा पशुपालकांना मोठा फायदा झाला.