बुलढाणा: कुलखेड शिवरातून रात्री गाय चोरीला; श्रीराम कानडजे यांनी केली पोलिसात तक्रार
By अनिल जाधव

बुलढाणा: कुलखेड शिवरातून रात्री गाय चोरीला; श्रीराम कानडजे यांनी केली पोलिसात तक्रार
बुलढाणा जिल्ह्यातील कुलम खेड येथील रहिवासी श्रीराम शामराव कानडजे यांची गाय काल रात्री त्यांच्या कुलखेड शिवारातील गोठ्यातून चोरीला गेली आहे. कानडजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची जर्सी गाय नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधलेली होती. आज सकाळी ते गोठ्यात गेले असता त्यांना गाय दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला, परंतु गाय कुठेही आढळली नाही.
या घटनेमुळे कानडजे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गाय चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांनी किंवा ज्या कोणाला या गायीबद्दल माहिती मिळाली असेल, त्यांनी कृपया पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कानडजे यांनी केले आहे.
गाय चोरीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे.