मुडी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय पाटील व व्हा.चेअरम उदय शिंदे यांची निवड..
अमळनेर(प्रतिनिधी):अमळनेर मुडी येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी संजय जिजाबराव सोनवणे यांची तर व्हाईस चेअरमन पदी उदय नथु शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटी चे प्रदीप सूर्यवंशी व व्हाईस चेअरमन योगराज संदानशिव राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कासोदेेकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकाची बैठक घेण्यात आली.यावेळी सोसायटी चे सर्व संचालके उपस्थित होते. यावेळी चेअरमन पदासाठी संजय पाटील यांचा तर उदय शिंदे व्हाइस.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधि- कारी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नुतन चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती विजू अण्णा व जि प सदस्य संगीता भिल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच काशीनाथ माळी उपसरपंच नारायण पाटील विजय जैन संजय पाटील नाना पाटील ग्रा प सदस्य गजू महाराज प्रणव सोनवणे हर्षल सोनवणे गौरव सुर्यवंशी हेमंत सोनवणे तुषार सुर्यवंशी प्रतिनिधी भरत पाटील गावातील आजी माजी ग्रा प सदस्य संचालक व गावातील नागरिक उपस्थित होते..