जि.प.प्रा.शाळा.लेहा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
By बाळकृष्ण उबाळे
जि.प.प्रा.शाळा.लेहा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
लेहा, दि. 26: भोकरदन तालुक्यातील लेहा येथे दिनांक 26 जानेवारी 20 25 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जि प प्रा शाळा केंद्र जळगाव सपकाळ येथे करण्यात आले आहे त्यावेळी सकाळी ध्वजारोहण मुख्याध्यापक एस जी पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नयन शेख सरपंच सौ लताबाई सोनवणे उपस्थित होत्या त्यावेळी मोठ्या संख्येने गावकरी व पालक उपस्थित होते त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला.
यामध्ये शाळेतील लहान मुलांनी अप्रतिम असे नृत्य विविध गाण्यावर सादर केले लहान मुलाच्या सुप्त गुणाचा वाव देण्यासाठी नृत्य नाटक गीत सादर झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे. श्रीवास्तव सर यांनी केले त्यावेळी एस आर बावस्कर सर तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी पी आर पडोळ सर डि.यु सास्ते सर जी बी भोपळे,एस एम उजाडे सर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने पालक वर्ग व गावकरी नागरिक आणि महीला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
लहान मुलांच्या उत्साह वाढवण्यासाठी कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे लेहा येतील जिल्हा परिषद शाळा अतिशय आनंदी व वातावरणात कार्यक्रम झाल्यामुळे जी. प शाळेचे गावात कौतुक करताना दिसुन येत आहे.