जालन्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला!
By तेजराव दांडगे

जालन्यात जिल्हा परिषद-पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला!
जालना, दि. १० ऑक्टोबर: जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ही सोडत सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११ वाजता ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
कुणाकुणासाठी आरक्षण निश्चित होणार?
उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभागांसाठी खालील प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षण निश्चित केले जाईल:
१) अनुसूचित जाती (महिला)
२) अनुसूचित जमाती (महिला)
३) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
४) सर्वसाधारण (महिला)
या सोडतीमुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, इच्छूक उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीच्या निकालाकडे लागले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.