D9 न्यूज मराठी – आजच्या ठळक घडामोडी:
D9 News Marathi - Today's highlights:

D9 न्यूज मराठी – आजच्या ठळक घडामोडी:
राजकीय:
• रामराजे नाईक निंबाळकरांना समन्स: सातारा पोलिसांनी जयकुमार गोरेंच्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले.
• कर्जमाफीचे आश्वासन मी दिले नाही: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनावरून हात झटकले.
• पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल प्रकरणी पुण्यातील आरोपीला अटक, चौकशी सुरू.
• पालघरचे एसपी भ्रष्ट: अंबादास दानवेंनी 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्डवर पालघरच्या एसपींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना सवाल केला.
• जितेंद्र आव्हाडांचा पलटवार: शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कांसाठी मुंजची गरज नसल्याचे सांगत जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश महाजनांवर टीका केली.
• सरकारचे धोरण स्पष्ट नाही: पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याचा मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा.
• सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढणार: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल.
• मोदी सरकारचा पाकिस्तानला दणका: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या युट्युब चॅनलवर बंदी.
आर्थिक:
• महिलांसाठी आनंदाची बातमी: एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पुढील 2-3 दिवसांत जमा होणार; कालपासून पैसे येण्यास सुरुवात.
• भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न: युट्युबर्सनी तीन वर्षात ‘यु ट्यूब’वरून तब्बल 21000 कोटी रुपये कमावले.
• आजचे सोन्याचे भाव: 22 कॅरेट: ₹ 88,530/- || 24 कॅरेट: ₹ 96,636/-
सामाजिक:
• सांगलीत मोठी चोरी: दिवसाढवळ्या 40 तोळे सोन्याची बॅग चोरी, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद.
• भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल नाही: संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार.
• पुण्यात गांजा जप्त: 13 लाखांचा 64 किलो गांजा शहरात सर्रास विक्री सुरू असताना जप्त.
• उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक: तीन दिवसात 9 बांगलादेशी नागरिकांना अटक.
• गोवा जत्रेत चेंगराचेंगरी: लईराई देवीच्या जत्रोत्सवात 6 भाविकांचा मृत्यू, 40 जखमी.
• शिवनेरीवर मधमाशांचा हल्ला: पर्यटकाला 170 मधमाशांनी डंख मारले.
आंतरराष्ट्रीय:
• पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री: लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या रॅलीत सहभाग घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल.
• पाकव्याप्त काश्मीरमधील मदरशांना सुट्टी: धार्मिक विभाग प्रमुखांनी नरेंद्र मोदी आणि हवामान हे दोन मोठे आव्हान असल्याचे सांगितले.
• भारतावर सायबर हल्ले: पहलगाम हल्ल्यानंतर 10 लाखांहून अधिक सायबर हल्ल्यांचा महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल.
हवामान:
• महाराष्ट्रात उष्णतेची लाट: सोलापूर 44.7 अंशांसह सर्वात हॉट, अकोल्याचे तापमान 44.5 अंश.
कला आणि मनोरंजन:
• ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित: तीन मित्रांच्या मैत्रीची कथा.
खेळ:
• गिलने जिंकले मन: गुजरात टायटन्सचे शानदार ‘कमबॅक’, हैदराबादचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर.
आषाढी वारी:
• आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर: माउलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान.