डेंग्यूची लागण झाल्यावर न.पा.आली ला जाग; आरोग्य विभाग व न.पा.च्या पथकाला तपासणीत १५ ठिकाणी डेंग्यू च्या अळ्या आढळल्या.
अमळनेर नगरपालिकेने केली साफसफाई व फवारणी..अमळनेर– अमळनेर ग्रामीण रुग्णालय व तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ६ पथकांनी सुमारे ६०० पथकांची तपासणी केली असता १५ घरच्या भांड्यांमध्ये डेंग्यू च्या अळ्या आढळून आल्या असून रुग्णांचे रक्त नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत लोकमत ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग व नगरपरिषद खडबडून जागे झाला न.पा.ने साफसफाई व फवारणी केली.
अमळनेर शहरातील सप्तशृंगी कॉलोनी, शिरुड नाका,शिवाजी नगर,कसाली मोहल्ला,मुंदडा नगर,भागात डेंग्यू चे सहा रुग्ण आढळून आले.
नगरपालिका चे नगराध्यक्ष पुष्पलता पाटील,मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी तातडीने आरोग्य विभागाला आदेश दिल्यावर सफाई व फवारणी करण्यात आली तसेचतालुका
वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे,डी बी राजहंस,किशोर माळी,खुशाल पाटील, पी डी सूर्यवंशी, एकनाथ पाटील, प्रमोद पाटील, अरुण पाटील यांच्यासह नगरपालिकेच्या सहा परिचारिका यांनी बाधित परिसरातील सुमारे ६०० घरांच्या पाण्याच्या टाक्या व साठवण भांडे तपासले असता १५ टाक्यांमध्ये डेंग्यू च्या अळ्या आढळून आल्या ते भांडे रिकामे करून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच त्या परिसरातील डेंग्यू रुग्णांचे रक्त नमुने घेऊन जळगाव येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.