न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन भोवले: तारखेस गैरहजर राहणाऱ्या आरोपीताला १४ दिवसांची कोठडी
(By तेजराव दांडगे)

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन भोवले: तारखेस गैरहजर राहणाऱ्या आरोपीताला १४ दिवसांची कोठडी
पारध (भोकरदन): न्यायालयीन तारखेस वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील एका आरोपीताविरुद्ध न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले होते. या वॉरंटनुसार स्थानिक पोलिसांनी आरोपीतास अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपीताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गैरहजेरीमुळे वॉरंट जारी
पारध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद क्र. 246/22 अंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणात आरोपीत सचिन कैलास लकस (वय ३१, रा. पारध खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना) याला न्यायालयासमोर हजर राहणे बंधनकारक होते. मात्र, आरोपीत लकस हा तारखेस सतत गैरहजर राहत असल्याने, न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन त्याच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले.
कोठडीत रवानगी
या वॉरंटची अंमलबजावणी करत पोलीस स्टेशन पारध येथील सपोनि संतोष माने आणि यांच्या पथकाने आरोपीत सचिन लकस याला ताब्यात घेतले आणि त्याला तातडीने संबंधित न्यायालयात हजर केले.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने आरोपीत सतत न्यायालयासमोर गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आणले. न्यायालयीन प्रक्रियेचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाने आरोपी सचिन लकस याला पुढील १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.



