पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
By तेजराव दांडगे

पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
पारध, दि. 09 (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे मागील काही दिवसांपासून मोकाट, आजारी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या संदर्भात पारध बु. ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी निवेदन देण्यात आले.
पारध बु. येथे सध्या मोठ मोठ्या जखम झालेले, खरुज झालेले, आजारी, मोकाट कुत्रे दिवसभर गावातील गल्लोगल्ली फिरत असल्याचे दिसत असून या आजारी कुत्र्यांचा वृद्ध आणि लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो.
पिसाळलेल्या कुत्र्यांची शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली आहे. सदर कुत्रे लोकांच्या घरात घुसत आहे तर बहुतांश कुत्र्यांची अक्षरशः दुर्गंधी सुटली आहे. या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करून ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करावा असे मंगळवार दि.९ रोजी रामेश्वर लोखंडे, ग्रा.पं.सदस्य गणेश लोखंडे रवी लोखंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर रामेश्वर लोखंडे, रवी लोखंडे, गजानन लोखंडे, बंटी बेराड, सागर श्रीवास्तव, अमोल श्रीवास्तव, सुनील देशमुख, सागर देशमुख, सुनील सपकाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहे.