आपला जिल्हाताज्या घडामोडीबुलढाणा जिल्हा
वंचित बहुजन आघाडीकडून धाडच्या नूतन ठाणेदारांचे स्वागत
By अनिल जाधव

वंचित बहुजन आघाडीकडून धाडच्या नूतन ठाणेदारांचे स्वागत
बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीने धाड पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार प्रताप बोस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा तालुका कार्यकारिणीने, ठाणेदार बोस यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीसाठी बुलढाणा तालुका अध्यक्ष मनोज खरात, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मोरे, तालुका उपाध्यक्ष युसूफ खान, किरण गवई, धाड शहर अध्यक्ष विजय गुजर, बुलढाणा तालुका महासचिव अनिल जाधव, बाळू पाटील, रमेश खरात, विजय थोरात, जयेंद्र बनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.