दुर्दैवी नैसर्गिक आपत्ती: वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या ५ कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत
By गोकुळ सपकाळ

दुर्दैवी नैसर्गिक आपत्ती: वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या ५ कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत
भोकरदन, दि. 27 : भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज पडून दुर्दैवी निधन झालेल्या पाच व्यक्तींच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती योजनेंतर्गत प्रत्येकी ४ लाख रुपये, याप्रमाणे एकूण २० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. स्थानिक आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते हे धनादेश वाटप करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून राज्यासह भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. याच अवकाळी पावसात भोकरदन तालुक्यातील गणेश प्रकाश जाधव, सचिन विलास बावस्कर (रा. कोठाकोळी), राहुल विठ्ठल जाधव (रा. केदारखेडा), रामदास आनंदा कड (रा. सिपोरा बाजार) आणि बाजीराव रामराव दांडगे (रा. सुरंगळी) या पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. आज भोकरदन येथे त्यांच्या वारसांना ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.