राजर्षी शाहू विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न
By तेजराव दांडगे
राजर्षी शाहू विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न
पारध, दि. 10:- येथील भिलदरी बहुद्देशीय संस्थेच्या राजर्षी शाहू विद्यालयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊमॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होती.
या स्पर्धेचे उद्घाटन भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष रेवतीताई मांटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. प्र.पाराशरनगरचे मुख्याध्यापक आर. व्ही. बावस्कर ,महर्षी पाराशर ऋषी इंग्लीश स्कूल च्या प्राचार्या साधना टेकाळे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेमध्ये परिसरातील परिसर शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, ज्ञानेश्वर अल्हाट, अनिल लक्कस, कलाशिक्षक विवेक प-हाड, स्वप्निल वाघ, श्रीमती एस. जी. कोळसे, श्रीमती एम. व्ही. अवसरमोल, श्रीमती एम. एस. वाघ, कु. निकिता देशमुख, कु. रूपाली बोराडे, भागवत पानपाटील ,गजानन लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.