दुचाकी चोर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
By तेजराव दांडगे

दुचाकी चोर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
जालना, दि. २६ मे २०२५: जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत एका दुचाकी चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरांना चांगलाच हादरा बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ०२/०४/२०२५ रोजी रात्री १०:३० वाजता दाभाडगाव ते झिरी फाटा दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी विश्वनाथ एकनाथ मिरकवड यांची होंडा शाईन मोटारसायकल चोरून नेली होती. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली.
तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नामे विकास ऊर्फ मिडडू संजय बर्वे (वय २९, रा. कनेरवाडी, ता. परतूर, जि. बीड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीताने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने चोरलेली होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल काढून दिली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तसेच पोलीस अंमलदार सुधिर वाघमारे, दिपक घुगे, लक्ष्मीबाई आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजने, इरशाद पटेल, संदीप श्रीवास, आबासाहेब भांडगे, भागवत खरात, धिरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे व इतर सहकाऱ्यांनी केली आहे. या कारवाईमुळे जालना पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.