क्राईम न्युज
१२ वर्षे लव्ह-अफेअर; तब्बल दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, कोण आहे. अक्षय जावळकर?
पुणे (हडपसर) : संपूर्ण प्रकरणात सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अखेरअटक करण्यात आली आहे. पतीची हत्या ही पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघचे अनैतिक संबध होते, अशी माहिती समोर आली आहे.
सतीश वाघ यांची हत्या कशासाठी?
भाडेकरू असलेल्या अक्षय जावळकर या तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधासह नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीच्या खुनाची ५ लाखाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. सतीश वाघ यांच्या खूनाचा कट घरातच त्यांच्या पत्नीने रचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने प्रियकराच्या मदतीने मारेकर्यांना ५ लाख रूपये देऊन पतीचा खून घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मोहिनी सतीश वाघ (वय ४८, रा. फुरसुंगी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सतीश तात्याबा वाघ (५८, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) असे खून केलेल्याचे नाव आहे. आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय ३० रा. शांतीनगर, धुळे ) नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२ रा. अनुसया पार्क, वाघोली) अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
अक्षय जावळकर कोण आहे?
अक्षय जावळकर हा सतीश वाघ हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. ३२ वर्षीय अक्षय जावळकरचे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांच्यांशी संबंध होते. पोलिसांच्या माहितीनुसार ८ वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी यांचं लव्ह अफेअर होतं, अक्षयचं कुटुंब २००१ पासून सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होतं. अक्षय हा जावळकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे. आई,वडील आणि अक्षय तिघे जण सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु होते. अक्षयच्या वडिलांचा भेळेचा, वडापावचा गाडा आहे, तिथेच अक्षयही काम करतो. अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेमसंबंधाबाबत सतीश वाघ यांना ८ वर्षांपूर्वी कुणकुण लागली. त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र, अक्षयचं वाघ यांच्या घरी येणे-जाणे सुरुच होतं. सतीश वाघ यांचा मुलगा आणि अक्षय हे मित्र होते, अशी माहिती आहे.
या प्रकरणाचा घटनाक्रम
2001 साली अक्षय जावळकरचे आई-वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. अक्षयचे वय तेव्हा फक्त नऊ वर्षांचे होते. अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे, तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं.
* सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले.
* मात्र अक्षय जेव्हा २१ वर्षांचा झाला तेव्हा २०१३ मध्ये त्याचे आणि त्यावेळी ३७ वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.
* दरम्यान अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र २०१६ ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले.
* मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले.
* सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली.
* मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं तिला वाटलं.
* अक्षयच्या मदतीने त्यांनी हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं.
* नऊ डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनीटातच त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्यावर तब्ब्ल ७० वार करण्यात आले.
* मात्र हे पैशांसाठी केलेले अपहरण आहे असा बनवा करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली , दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलघडा झाला आहे.
४८ वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं ३२ वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर, भाड्याच्या खोलीत अनैतिक संबंधांना अंकुर फुटला..
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.