जनतेच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या बी.एम.लोखंडे यांना जनता विद्यालयात आदरांजली
By तेजराव दांडगे

जनतेच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या बी.एम.लोखंडे यांना जनता विद्यालयात आदरांजली
पारध, दि. ५ सप्टेंबर, २०२५ – भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केळणा अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. एम. लोखंडे यांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदराने अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे, ज्येष्ठ शिक्षक आर. ए. देशमुख, प्रा. एन. एन. पाटील, आणि प्रा. संग्रामराजे देशमुख यांनी लोखंडे यांच्या प्रतिमेची पूजा केली.
प्रा. संग्रामराजे देशमुख आणि ग्रंथपाल बंकिमचंद्र लोखंडे यांनी लोखंडे यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. लोखंडे यांनी जनतेसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाला आणि त्यांच्या दूरदृष्टीला त्यांनी उजाळा दिला. त्यांच्या योगदानाला आदराने स्मरण करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी विजया कदम, मृदुला काळे, लता वानखेडे, प्रा. सुनील हजारे, प्रा. एस. एस. गडदे, प्रा. सुनील पायघन, शैलेंद्र बैस, ए. टी. सोनूने, एस. डी. बोर्डे, प्रितम मोरे, विजय चंदनसे, महेश शेळके, देविदास सुरडकर, नामदेव पवार यांच्यासह अनेक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.