पिंपळगाव रेणुकाई येथे पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
By गौतम वाघ

पिंपळगाव रेणुकाई येथे पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपळगाव रेणुकाई, दि. ०८: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्मशानभूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
या स्तुत्य उपक्रमासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात सरपंच पंचफुला बोर्डे, ग्रामविकास अधिकारी एच.बी. साळवे, प्रा. अनिल मगर, तसेच संतोष बोर्डे, प्रकाश बोर्डे, प्रा. सदाशिव शैलेश बोर्डे, प्रकाश लोखंडे, समाधान बोर्डे, दिनेश बोर्डे, अमोल बोर्डे, सुभाष बोर्डे, आकाश बोर्डे, पंडित तातेराव बोर्डे, राहुल साळवे, राजेंद्र बोर्डे, आदित्य जगताप, रोशन बिरारे, आणि राहुल बोर्डे यांसारख्या पुरुषांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले.
यासोबतच शिलाबाई बोर्डे, मंगलाबाई बोर्डे, रुपाली बोर्डे, आशा बोर्डे, निर्मला बोर्डे, शालुबाई बोर्डे, जिजाबाई लोखंडे, कौसाबाई बोर्डे, उज्वलाबाई बोर्डे, अनिता बोर्डे, आणि सविता बोर्डे यांसारख्या महिलांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला. गौतम बोर्डे, अक्षय बोर्डे आणि संघर्ष बोर्डे यांचीही उपस्थिती लक्षवेधी होती.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश बोर्डे आणि शैलेश बोर्डे यांनी केले. गावातील सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणासाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.