पारधच्या वैष्णवी डोईफोडेच्या कवितांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका!
By तेजराव दांडगे

पारधच्या वैष्णवी डोईफोडेच्या कवितांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका!
प्रतिनिधी (पारध, दि. ३०): पारध नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे यांची सुकन्या वैष्णवी राजाराम डोईफोडे हिच्या दोन हिंदी कवितांची आंतरराष्ट्रीय संकलन पुस्तकात निवड झाली आहे. ‘व्हिस्पर्स बेनिथ नाईट स्काय वर्सेस अंडर द स्टार इज नाईट’ या शीर्षकाच्या या आंतरराष्ट्रीय संकलन पुस्तकात वैष्णवीच्या ‘मन का साथी’ आणि ‘होस्टेल डायरी के आखरी पन्ने’ या दोन कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
‘थॉट्स हिमन पब्लिशर्स’ मार्फत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा हा पाचवा खंड आहे. वैष्णवी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, ती राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक केंद्रामध्येही शिक्षण घेत आहे. तिच्या या remarkable काव्य निवडीबद्दल सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. सुखदेव मांटे, अध्यक्ष रेवती मांटे, कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, उपप्राचार्य अमोल बांडगे, आणि प्रा. अनिल मगर यांनी वैष्णवीचे विशेष अभिनंदन करत तिच्या पुढील काव्यमय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे यांनी सांगितले की, वैष्णवीचा स्वतःचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. वैष्णवीच्या या यशाने पारध परिसराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.