आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्काराचा मान! जालन्याच्या बोर्डे परिवाराला ‘आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कार’, देऊन सन्मानित
By देवानंद बोर्डे

आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्काराचा मान! जालन्याच्या बोर्डे परिवाराला ‘आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कार’, देऊन सन्मानित
जालना, दि. ०६ : धम्मभूमी देहूरोड ते दीक्षाभूमी नागपूरपर्यंत सलग १८ वर्षे ‘धम्मरथ अभियान’ परिक्रमा करून अखंड धम्म अभियानाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बोर्डे परिवाराचा नुकताच ‘ आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या परिवाराच्या धम्मनिष्ठेचं आणि अथक कार्याचं हे मोठं यश आहे.
बोर्डे परिवारातील आयुष्यमती आशाबाई , आयु. प्रकाश बोर्डे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली सतरा वर्षे पूर्ण करून आता अठराव्या वर्षातही हा धम्मरथाचा प्रवास म्हणजेच “धम्म अभियान”अव्याहत सुरू आहे. डॉ. शामल अनिल जाधव आणि प्रा. डॉ. दि. वा. बागुल यांच्या हस्ते आशाबाई व प्रकाश बोर्डे यांना हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
धम्मभूमी देहूरोड आणि दीक्षाभूमी नागपूर यांना जोडणारी ही परिक्रमा महाराष्ट्रातील धम्मबांधवांसाठी श्रद्धेचं आणि प्रेरणेचं केंद्र आहे. बोर्डे परिवाराने इतकी वर्षे ही धम्म अभियान यात्रा नेटाने आणि श्रद्धेने पार पाडली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळेच त्यांना ‘ आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कारा’चा मान मिळाला, ज्यामुळे पिंपळगाव रेणुकाई गावाची मान उंचावली आहे.